महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उरण दि. १९ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण यांच्या वतीने उरण येथील नाईक नगर झोपडपट्टीत गरजू विद्यार्थ्यांना शाळेपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कोणाला काही अडचण असेल, समस्या असेल तर पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले. या प्रसंगी आदर्श शिक्षिका सुनंदा कुमार मॅडम यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे गणेश पाटील, वैभव पवार,राजेश म्हात्रे, प्रशांत भोईर, जयेश मोकल, रवि मोकल, स्वप्नील कुंभार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पप्पू सूर्यराव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE