शिवसेना नवीन शेवा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वह्यावाटप

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) :  शिवसेना नवीन शेवा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वह्या वाटप व जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रम माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली  सोमवार दि. 21 ऑगस्ट 2023 रोजीसंपन्न झाला.शैक्षणिक कार्यक्रमामध्ये 10 वी, 12 वी व विविध विभागातील पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व  विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले तर सामाजिक कार्यक्रमात उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील यांच्या सौजन्याने जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी आपले मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिवसेना नवीन शेवा शाखेच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष हा कार्यक्रम केला जातो, त्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो व पुढच्या वर्षात येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सर्वांनी सज्ज राहून भगवा फडकविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले तर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर,तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, महिला उपजिल्हा संघटिका  ममता पाटील आदींची भाषणे झाली  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका संघटक  के एम घरत यांनी केले
या कार्यक्रमास उरण तालुका संपर्कप्रमुख जे पी म्हात्रे, उरण गटनेते  गणेश शिंदे, शिवधन पतसंस्थेचे अध्यक्ष  गणेश म्हात्रे,शिक्षक सेनेचे  नरेश मोकाशी, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख  जगजीवन भोईर, शहर संघटक  किसन म्हात्रे, युवानेते  दीपक भोईर, सोशल मीडियाचे  नितीन ठाकूर, सरपंच सोनल घरत, उपसरपंच  कुंदन भोईर,ग्रामपंचायत सदस्य  अशोक दरने,  भुपेंद्र पाटील, मयुरी घरत,वैशाली म्हात्रे, प्रणिता भोईर, जे एन पी टी शाखाप्रमुख  एल जी म्हात्रे, गावचे सेक्रेटरी  शेखर पडते, श्रीमती वासंती म्हात्रे,  लीलावती भोईर, माजि उपसरपंच  वनिता म्हात्रे, माध्यमीक शाळेचे मुख्याध्यापक  संतोष म्हात्रे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  ही.स.म्हात्रे गुरुजी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख  शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख अशोक म्हात्रे,  सुरेश पाटील, दिलीप घरत,  निलेश घरत, दिनेश घरत, पंकज सुतार, अजय सुतार,  केशव घरत,  महिला आघाडी शाखाप्रमुख वैशाली सुतार, सुरेखा भोईर, शुभांगी भोईर, प्रमिला घर, सुनंदा भोईर, जागृती घरत, मनिषा घरत व शिवसैनिक यांनी मेहनत घेतली.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE