सोलापूर : एन बी नवले अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 35 व्या राज्यस्तरीय कॅडेट जुनियर व सीनियर किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील 21 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये जिल्ह्याला 4 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्यपदक प्राप्त झाली.
या स्पर्धेत ७-९ वर्ष मुले वयोगटात पॉइंन्ट फाईट प्रकारात 28 किलो वरील वजन गटात शिवम सिंग – कास्यपदक तसेच मुलींमध्ये 28 किलो वरील वजन गटात अस्मी नाईक- रौप्य पदक, प्रेक्शा जाधव – कांस्यपदक, आर्या मोरे -कांस्यपदक, 10 ते 12 वर्षे वयोगटात 47 किलो वरील वजन गटात दिग्विजय चौगुले – कांस्यपदक मुलींमध्ये 28 किलो खालील वजन गटात पूर्वी शिंदे -कांस्यपदक, 37 किलो खालील वजन गटात तेजश्री चौगुले- कांस्यपदक, 47 किलो वरील वजन गटात श्रावणी गुरव- कास्य पदक, लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात मुलांमध्ये 37 किलो खालील वजन गटात खुशियाल गुप्ता- कांस्यपदक, 13 ते 15 वर्षे वयोगटात मुलींमध्ये पॉईंट फाईट प्रकारात 42 किलो खालील वजन गटात आर्या पाटीलने कांस्यपदक मिळवले.
या स्पर्धेत 55 किलो खालील वजन गटात सुखदा गावडे – कांस्यपदक, 16 ते 18 वर्षे वयोगटात मुलांमध्ये पॉईंट फायटिंग प्रकारात 69 किलोखालील वजन गटात दीप मोरे- सुवर्णपदक, सुजल गावनंग- रौप्य पदक लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात 63 किलो खालील वजन गटात रुपम बोबले- रौप्य पदक, 69 किलो खालील वजन गटात कुणाल झुजम -सुवर्णपदक, दीप मोरे -रौप्य पदक, 19 ते 40 वर्ष वयोगटात पुरुषांमध्ये लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात 74 किलो खालील वजन गटात तुषार मयेकर रौप्य पदक, किक लाईट प्रकारात 74 किलो खालील वजन गटात स्वानंद खेडेकर- सुवर्णपदक, 19 ते 35 वर्षे वयोगटात महिलांमध्ये पॉइंट फायटिंग प्रकारात 70 किलो खालील वजन गटात स्वप्नाली पवार – सुवर्णपदक प्राप्त केले तसेच आराध्य मनोरकर व मुस्कान इस्लाम यांनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करीत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व केले .
यशस्वी खेळाडूंना जिल्हा संघटनेच्या सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे, हुजैफा ठाकूर, विनोद राऊत, स्वप्नाली पवार,प्रणित सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील प्रविण्यप्राप्त खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजय खाडे, उपाध्यक्ष सुयोग सावंत, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सी. ए. तांबोळी, सचिव बापूसाहेब घुले यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
