रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हापा- मडगाव तसेच पोरबंदर ते कोचुवेली या दोन एक्सप्रेस गाड्यांना रेल्वेने अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गे धावणाऱ्या गाड्यांना होणाऱ्या गर्दी होऊ लागल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या (22908) गाडीला दिनांक 23 ऑगस्ट रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावणाऱ्या फेरीसाठी (22907) दिनांक 25 ऑगस्ट स्लीपर चा एक अतिरिक्त कोच जोडला जाणार आहे. दिनांक 23 ला आता हापा येथून मडगावकडे येणारी सुपरफास्ट एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी 24 रोजी कोकण रेल्वे मार्गावर येईल.
याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला (20910) दिनांक 24 ऑगस्टच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर या फेरीसाठी (20909) स्लीपर श्रेणीतील एक अतिरिक्त कोच दि. 27 ऑगस्टच्या फेरीसाठी जोडण्यात येणार आहे.
