भारताचं चंद्रावर पहिलं यशस्वी पाऊल!

बंगळुरु : देशवासीयांसह अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा फडकवत अनेकांनी जल्लोष केला. भारताची चांद्र मोहीम यशस्वी झाल्यानंतर देशवासीयांनी ऐकमेकांना पेढे वाटले, कुणी मंदिरात जाऊन आरती केली तर कुणी ढोल-ताशे वाजवून, नाचत आनंद व्यक्त केला.

ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर विदेशात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान चंद्रावर उतरल्याचा ऐतिहासिक क्षण विदेशातून लाईव्ह अनुभवल्यानंतर त्यांनी ही मोहीम यशस्वी झाल्याबद्द शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE