प्रा. मानसी चव्हाण यांचा राज्यस्तरीय लेखन स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक

रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी): मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई पारितोषिक वितरण समारंभ संघाच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या१२५ व्या जयंती वर्षानिमित्त लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रभरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. मानसी मंगेश चव्हाण यांच्या ” आम्ही काय कुणाचे खातो” या लेखाला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.


प्राध्यापिका सौ. मानसी मंगेश चव्हाण पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून गेली १२ वर्षे कार्यरत आहेत.
त्यांना पयार्वरण मित्र पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा प्रथम पुरस्कार, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त व राष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. या सोबत त्यांची व्यावसायिक मार्गदर्शन व सामाजिक उपक्रमाअंतर्गत व्याख्याने होत असतात.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE