वेग आणी स्टॅमिनाचा मानकरी ठरला रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरेचा पृथ्वीराज कडू!

तालुका क्रीडा स्पर्धेत ३००० मिटर प्रकारामध्ये प्रथम क्रमांक

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा जेएनपिटी टाऊन शिप येथे पार पडल्या. या स्पर्धेत महत्वाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे 3000 मिटर धावणे यात वेग व स्टॅमिना असे दुहेरी कसब खेळाडूला पणाला लावावे लागतात.या स्पर्धेत रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे मधील ईयत्ता अकरावी मध्ये शिकत असलेल्या 16 वर्षिय पृथ्विराज कडू याने वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्याची जिल्हास्तरावर नियुक्ती झाली आहे.

3000 मिटर स्पर्धेसाठी खेळाडूला मैदानावर तसेच डोंगर रांगा व समुद्राच्या वाळूवर सराव करावा लागतो.त्याचबरोबर काही व्यायाम प्रकार ही करावे लागतात तेव्हा वेग आणी स्टॅमिनाचा मेळ बसतो. त्यामूळे ही स्पर्धा महत्वाची मानली जाते,पोलीस भरती व सैन्यदल भरतीसाठी म्हणूनच या धावण्याच्या प्रकाराची मैदानी परिक्षैसाठी समावेश आहे.या शालेय स्पर्धेत रामचंद्र म्हात्रे विद्यालयाच्या पृथ्विराज कडू याने 7 मिनीटे ही वेगवान वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्वल केले.


या स्पर्धेत रामचंद्र म्हात्रे विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेज आवरेचा दबदबा

प्रणय सागर पाटील 1500मिटर तृतीय,कर्तव्य गावंड 1500मिटर प्रथम ,400 मिटर द्वितीय,थाळीफेक द्वितीय ,पियुष म्हात्रे 200 मिटर द्वितीय,निमेश म्हात्रे 400 मिटर तृतीय,आर्यन म्हात्रे,शुभम म्हात्रे भालाफेक अनुक्रमे द्वितीय व तृतीय. तसेच मुलीं मध्ये सनई गावंड 1500 मिटर द्वितीय, श्रेया कोळी 400 मिटर धावणे प्रथम,लांब उडी द्वितीय,सांज पाटील 400 मिटर धावणे तृतीय,वेदांगी ठाकूर 200 व 100 मिटर धावणे द्वितीय.तर मुलींचा रीले द्वितीय व मुलांचा रिले संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

यातील प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक प्राप्त खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे.क्रिडा शिक्षक जानकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या विजेत्या खेळाडूंचे विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर व विद्यालयाच्या सर्व शिक्षक वर्गाने व कर्मचार्‍यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE