दापोली : तालुक्यातील महाळुंगे गावचे मुंबई, विरार येथे राहणारे संदीप यशवंत रुके यांची सुकन्या श्रावस्ती संदीप रुके ही ( सा रे ग म प लिटिल चॅम्प्स ) झी मराठी चवहिनीवरील गाण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन गात आहे. श्रावस्ती ही या स्पर्धेत सध्या अंतिम फेरीच्या वाटेवर आहे.
तिला फायनलमध्ये जाण्यासाठी बहुमूल्य वोटिंगची आवश्यकता आहे. अंतिम फेरीसाठी वोट करण्याकरिता तुम्ही 9920007031 या नंबरवर काॅल करायचा आहे. या नंबरवर फोन केल्यावर दोन वेळा रिंग वाजेल आणि फोन खंडित होईल. या नंतर तुम्हाला तुमचे वोट केल्याचे रजिस्टर झाले असा तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि आपण वोट केल्याचे खात्री होईल.
दापोलीतील एका छोट्याशा गावातील या सुकन्येला जास्तीत जास्त वोट करून स्पर्धेत अंतिम फेरीत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
