Konkan Railway | मंगळूरु -मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसचा प्रवास सीएसएमटी ऐवजी दादरला संपणार!

मुंबई : मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी या कोकण रेल्वे मार्ग दररोज धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा प्रवास दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी दादरला संपणार आहे.


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलट क्रमांक दहा व अकराच्या विस्तारीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. या विस्तारीकरणाच्या कामामुळे मंगळूर ते मुंबई सीएसएमटी (12134) ही गाडी दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत दादर टर्मिनस पर्यंतच धावेल.

 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE