‘खल्वायन’च्या दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफलीत
विदुषी मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांच्या गायनाची पर्वणी

रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ७.३० या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालय , पर्‍याची आळी, बाजारपेठ, रत्नागिरी येथे रंगणार आहे.पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “कुमार गंधर्व गायकी विचार दर्शन” या कार्यक्रमाद्वारे पुण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी सौ. मंजिरी कर्वे – आलेगांवकर ह्या शब्द आणि सुरां द्वारे कुमार गंधर्व यांची गायकी श्रोत्यांसमोर उलगडून दाखविणार आहेत. ही संगीत मैफल फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने प्रायोजित केली आहे.


सौ.मंजिरी कर्वे – आलेगांवकर ह्या आकाशवाणी व दूरदर्शनच्या टॉप ग्रेड आर्टिस्ट असून, त्यांना भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते “कुमार गंधर्व पुरस्कार “ मिळालेला आहे. तसेच माणिक वर्मा, स्वरसाधना, राजहंस प्रतिष्ठान, आणि संगीत शिरोमणि ह्या पुरस्काराने सुद्धा त्या सन्मानित आहेत. गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्य व मंजिरीताईंचे वडील व गुरु पंडित मोहन कर्वे यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे सुरवातीला शिक्षण मिळाले. त्यानंतर पंडित नवनीतभाई पटेल, कै. वामनरावजी देशपांडे, कै. अप्पा कानीटकर, पंडित हळदणकर या गुरूंचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.

शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीत, नाट्य संगीत, उर्दू गझल. ठुमरी, निर्गुणी भजन इ. संगीत प्रकारांचाही त्यांचा अभ्यास असून अनेक सांगीतिक विषयांवर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया,अमेरिका, कॅनडा इ. ठिकाणी त्यांनी मैफली सादर केलेल्या आहेत. सदरहू कार्यक्रमाला हार्मोनियम साथ श्री. वरद सोहनी(रत्नागिरी) व तबला साथ श्री. अजित किंबहुने(पुणे) हे नामवंत कलाकार करणार आहेत.


सदरहू मैफल सर्व रसिकांना विनाशुल्क असून,सर्व रसिकांनी उपस्थित राहून मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE