पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजकपदी प्रा. योगेश यशवंत हळदवणेकर

रत्नागिरी : प्रदेश भारतीय जनता पार्टीच्यावतीने नव्याने सुरू केलेल्या पंचायतराज व ग्रामविकास या विभागाच्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजक पदी प्रा. योगेश यशवंत हळदवणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी करण्यात आली. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पंचायतराज व ग्रामविकास विभाग रत्नागिरी (द ) जिल्हा संयोजक गणेश पवार उपस्थित होते.

केंद्र व राज्याच्या साधारणता 1200 च्या आसपास योजना आहेत, अनेक योजना नागरिकां पर्यंत पोहोचत नाहीत, यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन योजनांची माहिती सांगायची आणि यामधून जे लाभार्थी मिळणार आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा. कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने काम केले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक समाज बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प पूर्ण होणार आहे. त्यांदृष्टीने कार्य करण्याचे मार्गदर्शन बाळासाहेब माने आणि गणेश पवार यांनी केले. पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ग्वाही यावेळी योगेश हळदवणेकर यांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE