देवरूख (सुरेश सप्रे ) : श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित समाज देवरुख खालची आळी तर्फे महापुरुष पिंपळाचे पारावर ९७ वी श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या महापुजेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार दि. २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२३ या दरम्यान तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा होतील. त्याचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ६.०० वा. उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न होईल.सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी बक्षिस समारंभ तर दि. २८ रोजी विविध गुणप्रदर्शन कार्यक्रम दि. २९ रोजी सायं. ६.०० ते ८.०० विविध महिलांसाठी फनी गेम्स दि. ३० रोजी सकाळी ९.०० वा. ग्रामदेवता सोळजाई देवी प्रथेनुसार महापुजेचे आमंत्रण सायं. ८.०० ते ९.०० वा. स्थानिक भजन. तर रात्रौ १० वाजता प्रतिवर्षाप्रमाणे मंडळाच्या यशस्वी कलाकारांचा खास कार्यक्रम आचार्य अत्रे लिखित, दोन अंकी विनोदी नाटक लग्नाची बेडी सादर करणेत येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अजित सावंत व सचिव रवींद्र सुवारे यांनी केले आहे.
