रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग आठवड्यातून एकदा धावणाऱ्या हिसार- कोईमतुर एक्सप्रेसला वातानुकूलित श्रेणीचा डबा वाढवण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होत असलेली गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
हिसार -कोईमतुर (22475) या फेरीला हिसार येथून ३ ते 31 जानेवारी 2024 या कालावधीसाठी तर कोईमतूर ते हिसार मार्गावरील फेरीसाठी (22476) दिनांक 6 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी वातानुकूलित तू टायर दर्जाचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे.
पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी झाल्याने रेल्वेने सध्या धावत असलेल्या गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचे धोरण स्वीकारले आहे.
