रत्नागिरीत २९ ते ३१ जानेवारी दरम्यान चाचा नेहरू बाल महोत्सव


रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : छत्रपती शिवाजी स्टेडीयम मारुती मंदिर येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेला आहे.


जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या
शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो.

यावर्षी या महोत्सवात संस्थाबाहय (नगर परिषद शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत.
बाल महोत्सवात क्रिकेट, खोखो, कबडडी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १०० मीटर रिले, कॅरम, बुध्दीबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामुहिक गायन, नाटिका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन इ. सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE