अमळनेर साहित्य संमेलनात ‘हळवा कोपरा’ पुस्तकाचे होणार प्रकाशन

संगमेश्वरचे जे. डी. पराडकर यांचे लेखन

संगमेश्वर, दि. २९ : अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संगमेश्वर येथील लेखक – पत्रकार जे. डी. पराडकर यांच्या चपराक प्रकाशन पुणे, संपादक घन: श्याम पाटील यांनी संपादित केलेल्या ‘ हळवा कोपरा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे .

चपराक प्रकाशन पुणे यांनी गेल्या दोन वर्षात जे. डी. पराडकर यांची एकूण सहा पुस्तके प्रकाशित केली असून ‘ हळवा कोपरा ‘ हे त्यांचे सातवे पुस्तक आहे. आजवर जे.डी. पराडकर यांची एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात आणि साने गुरुजी यांच्या अमळनेर या कार्यक्षेत्रात पुस्तकाच्या होणाऱ्या प्रकाशन समारंभाला शिक्षण तज्ञ आणि लेखक संदीप वाकचौरे , चपराकचे संपादक घनश्याम पाटील , सर्जक पुस्तकाचे लेखक मयूर बागुल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 

लेखनाला योग्य न्याय देणारा संपादक

गेली ३२ वर्ष आपण कोकणचे पर्यावरण, पर्यटन, निसर्ग, प्राचीन मंदिरे, गड – किल्ले यावर सातत्यपूर्ण लेखन करत आलो आहोत. हे लेखन करत असताना भविष्यात आपले एखादे पुस्तक येईल, असे मला त्यावेळी वाटले नव्हते. कालनिर्णय चे संचालक जयेंद्र साळगावकर यांच्या सहकार्याने पुणे येथील चपराक सारखी अत्यंत दर्जेदार प्रकाशन संस्था आणि उत्तम लेखनाला न्याय देणारे संपादक घनश्याम पाटील यांची ओळख झाली. पाटील यांनी माझे लेखन अत्यंत बारकाईने वाचून, एक नव्हे तर आपली पाच पुस्तके प्रकाशित करू असा शब्द दिला. चपराक प्रकाशन एवढ्यावरच थांबले नाही, तर अमळनेरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घन:श्याम पाटील माझे सातवे पुस्तक प्रकाशित करत आहेत. या लेखन प्रवासाचा नक्कीच आनंद आहे. लेखनाला योग्य न्याय देणारा संपादक, असे मी घन:श्याम पाटील यांचे वर्णन करेन.

– जे. डी. पराडकर, लेखक.

 

”हळवा कोपरा’ या पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे रेखा व रंग कलेचे शिक्षण घेतलेल्या अमेय कोलते याने रेखाटले असून प्रस्तावना चपराक प्रकाशनचा एक भाग असलेले सजग वाचक अरुण कमळापूरकर यांनी लिहिली आहे. पुस्तकाची मूळ किंमत २५० रुपये असून, २ फेब्रुवारी पर्यंत प्रकाशन पूर्व सवलतीत सदर पुस्तक केवळ दोनशे रुपयात उपलब्ध होणार आहे. पुस्तकासाठी चपराक प्रकाशन ७०५७२९२०९२ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE