रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील सुप्रसिद्ध मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त सोमवारी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांची ही दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
सोमवारी संकष्टी चतुर्थी दिनी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून भाविकांनी गणपतीपुळे येथे उपस्थित राहून समुद्रकिनारी वसलेल्या मंदिरातील श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.

संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून मंदिरात मुख्य पुजारी श्री. अभिजीत घनवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगीबेरंगी फुलांचे छान आरास केली होती.
