- शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लॅन्टचे उदघाटन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : ग्रामपंचायत नवघर तर्फे कुंडेगाव येथे घरोघरी प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. तसेच शुध्द पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नवघर येथे आरओ प्लॅन्ट बसविणेत आले.
सरपंच कविता मढवी, उपसरपंच विश्वास तांडेल,माजी उपसरपंच दिनेश बंडा,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी जे. के. म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, परिसर स्वच्छ राहावा, रोगराई पसरू नये या अनुषंगाने स्वच्छते विषयी जनजागृती करत नागरिकांना कचरा जमा करण्यासाठी घरोघरी कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. तसेच विविध रोगराई व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्लॅन्ट सुद्धा बसविण्यात आले.
या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी प्रशंसा केली. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले आहेत.
