युरोपातही घुमला छत्रपती शिवरायांचा जयजयकार !

महाराष्ट्रतील तरुणांनी साजरी केली शिवजयंती

गुहागर : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदोत्साहात साजरी होत असतानाच, परदेशातही शिवगर्जनेने आसमंत दणाणून सोडला. महाराष्ट्राप्रमाणे युरोपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली.


हे सर्वजण युरोपमधील स्लोवाकी येथील जग्वार लँड रोव्हर या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरीला आहेत. शिवजयंतीनिमित्त सकाळी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना, आरती, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे चरित्र सांगितले.


याबाबत गुहागरमधील निखिल रेवाळे यांने सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटले की एक वेगळाच जोश स्फुरत असतो. गुहागरमध्ये असताना शिवतेज फाउंडेशन तर्फे गेली अनेक वर्षे शिवरथ यात्रा मोठ्या दिमाखात काढली जाते. या शिवरथ यात्रेत सहभागी होत असे. जगामध्ये कुठेही असलो तरी शिवजयंती साजरी करायची या उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून युरोपमध्ये शिवजयंती साजरी केली. परदेशातील शिवजयंती सोहळ्याचा अनुभव आणि विशेष करून परदेशातील शिवजयंतीचा अनुभव हा शब्दांमध्ये सांगता येणार नाही तर, तो प्रत्यक्ष घेतला गेला पाहिजे. तसेच येणाऱ्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व त्यांचा इतिहास पोचावा यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्‍यक असल्याचे निखिल याने सांगितले.


निखिल याच्या सोबत प्रशांत कोरडे, निखिल बोरडे, केतन सोनार, तन्मई सुतार, पल्लवी राठोड, वैष्णवी सोहनी, प्राजक्ता गायकवाड, जयेश शेलार, प्रशांत भाते, चेतन जाधव, अलिषा भालेराव आदींनी या शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE