मुंबई : मध्य रेल्वेच्या जिल्हा आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकावर कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १० एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. यावेळी खासदार तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्या बैठकीत मांडल्या.
खासदार तटकरे यांनी या बैठकीला उपस्थित राहून विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. रजनीश कुमार गोयल यांच्यासोबत रायगड जिल्ह्यासंबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी कुमार वैष्णव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मागण्यांविषयी अवगत केले.

रोहा व पनवेलमध्ये दु. १२.४५ ते सं. ६.३० पर्यंत रेल्वेच्या एकाही गाडीचा थांबा उपलब्ध नसल्याने एलटीटीवरून दक्षिणेच्या दिशेने धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसला रोहा स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी केली.
रोहा स्थानकावर या गाड्यांना मागितले थांबे
दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, इंदोर-कोचुवेली एक्स्प्रेस, दादर-तिरुनेलवेली जं. एक्स्प्रेस, चंढीगड – कोचुवेली एक्स्प्रेस, चंढीगड – मडगांव एक्स्प्रेस, हिसार – कोईमतूर जं. एक्स्प्रेस, एलटीटी – मडगांव एक्स्प्रेस या गाड्यांचा रोहा स्थानकातील थांबा ऑपरेटिंग हॉल्टमधून व्यावसायिक हॉल्टमध्ये रुपांतरीत करण्यात यावा, अशीही मागणी खासदार तटकरे यांनी केली.
त्याचबरोबर, दिवा-सावंतवाडी (१०१०५) व सावंतवाडी-दिवा (१०१०६) या गाड्यांना रोहा व पेण स्थानकांवर थांबा देण्याची मागणी केली. तसेच, प्रवाश्यांचा इतर समस्यांबाबतही सविस्तर चर्चा केली.
- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या
