कोकण रेल्वे मार्गावर १९ मार्चपासून होळीसाठी विशेष गाड्या

  • खेड, चिपळूण, सावर्डेसह रत्नागिरी, आडवली राजापूरला थांब

रत्नागिरी : अहमदाबाद ते मडगाव अशा कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या होळी विशेष गाड्या दिनांक १९ मार्च २०२४ पासून धावणार आहेत.

यावर्षीच्या होळीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर येणारी पहिली होळी विशेष गाडी जाहीर झाली आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार अहमदाबाद ते मडगाव (09412) ही होळी विशेष गाडी दिनांक 19 व 26 मार्च 2024 र अशी आठवड्यातून एकदा धावणार आहे. अहमदाबाद येथून ही गाडी सकाळी ९.३० वाजता सुटेल मडगावला ती दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.

होळी विशेष गाडीचे थांबे

वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी तसेच करमाळी.


परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (09411) मडगाव येथून दिनांक 20 व 27 मार्च 2024 रोजी सुटेल. मळगाव येथून ही गाडी सकाळी आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी अहमदाबादला ती सकाळी सात वाजता पोहोचणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE