कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ

खेड ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अशी पहिली मालगाडी रवाना

रत्नागिरी : मालवाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्यासाठी रत्नागिरी पाठोपाठ आता खेड येथून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. गुरुवारी खेड रेल्वे स्थानकावरून ८ कंटेनर लोड झाले . खेड ते जवाहरलाल नेहरू (जे एन पी टी ) पोर्ट अशी ही खेडवरून सुटलेली पहिली मालगाडी रवाना झाली. खेड तालुक्यातीलbलोटे तसेच चिपळूण येथील औद्योगिक वसहतीतून उत्पादित माल मालाची परदेशात निर्यात करणे शक्य झाले आहे.

कोकण रेल्वेचे संचालक श्री. संतोष कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण रेल्वे प्रशासन, कॉनकोर (CONCOR) यांच्या अथक प्रयत्नातून कोकणातील उत्पादित माल अधिक सोयीस्कर, जलद आणि किफायतशीरपणे वाहतूक व्हावा, यासाठी रेल्वे मालभाडे ग्राहक यांना सुविधा उभारणीसाठी गती देण्यात आली आहे.

गुरुवारी कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावर रेल्वे कंटेनर माल गाडीच्या शुभारंभावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्री. रवींद्र कांबळे, विभागीय वरिष्ठ यातायात प्रबंधक दिलीप भट, काँनकॉरचे राजन साळुंखे, श्री. हर्षवर्धन, नितीन चव्हाण, खेड येथील कंटेनर डेपोचे सेसा लॉजिस्टचे सिद्धाराम आंब्रे, सागर आंब्रे, कृष्णा अँटीऑक्सिएड कंपनीचे श्री. पाटील, यादव, कोकण रेल्वेचे एरिया सुपरवाईझर श्री. रॉय, गुड्स सुपर वाईझर श्री. अनुप पेडणेकर , सह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘काँनकॉर’ने  याआधी रत्नागिरी येथे ही कंटेनर रेल्वे वाहतूक व्यवस्था केली आह. रत्नागिरी येथून सागरी मासे, हापूस आंबा प्रक्रिया केलेला माल कोकण रेल्वेच्या माध्यमातून परदेशात निर्यात होत आहे. यावेळी खेडमधून सुरू झालेल्या माल वाहतुकीमुळे होणारे फायदे स्पष्ट करण्यात आले. कोकण रेल्वेने व्यापार वृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे मुलभूत सुविधां दिल्या आहेत. यात गोदाम, शीतगृह अशा विविध सुविधांचा समावेश आहे. खेडमध्ये उद्योजकांना काँनकॉरकडून अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर आहे रत्नागिरी येथे ‘महाप्रीत’ महाराष्ट्र राज्य आणि कोकण रेल्वे यांच्या वतीने कंटेनर शीतगृह डेपोचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE