लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलामार्फत उरणमध्ये ‘रूट मार्च’

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे )आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ २ अंतर्गत असलेल्या उरण तालुक्यात कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकावर, गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात याकरीता पोलीस दला मार्फत उरण शहरात तसेच उरण तालुक्यात विविध ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला.

उरण पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन आणि रूट मार्च दिनांक २३/०३/२०२४ रोजी १०:३० वा ते ११:०४ वा. चे दरम्यान जासई पोलीस चौकी येथुन जासई गावा मधून दी.बा. पाटील मंगल कार्यालय पर्यंत, तसेच ११:४५ ते १२:३० वाजे दरम्यान उरण एसटी स्टँड चार फाटा येथुन उरण शहरातून राजपाल मार्गे उरण कोर्ट पर्यंत व १२:०५ ते १२:४० वा जे दरम्यान मोरा पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान कोळीवाडा येथून बेलदार वाडा मार्गे हनुमान मंदिर मोरा जेटी पर्यंत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ चे पुर्व तयारी चा भाग म्हणून एरिया फॅमिलीरिसिशन अँड एरिया डॉमिनेशनची मोहीम वरिष्ठांच्या आदेशानुसार राबवून सदर भागात रूट मार्च काढण्यात आला.


सदर रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,पोनि (गुन्हे) सूर्यकांत कांबळे, ०८ एपीआय /पीएसआय , ३० पोलीस अंमलदार तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील शिंदे , ०१ एपीआय , ११ पोलीस अंमलदार यांच्यासह आरपीएफ चे ३ अधिकारी,३० अंमलदार असे शस्त्रे, लाठी, हेल्मेट व वाहनांसह सहभागी झाले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE