उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय सचिव तथा NMGKS संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यांची दि. २१ मार्च २०२४ रोजी लंडन येथे झालेल्या निवडणुकीत ITF या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक व वेअरहौसिंग विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
महेंद्र घरत हे ITF परिषद संपवून आज दि. २३ मार्च २०२४ रोजी लंडनहून आपल्या मायदेशी परतले. शेलघर येथे त्यांचे सहकारी, मित्र, कामगार व घरत परिवारातील सदस्यांनी त्यांचे ढोलताश्यांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतशबाजीत जंगी स्वागत केले.

१४० देश सदस्य असलेल्या ITF या बहुराष्ट्रीय कामगार संघाच्या उपाध्यक्षपदापर्यंत आगरी समाजातील कामगार नेता भरारी घेतोय ही समाजासाठी तसेच भारतीय कामगार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. महेंद्रशेठ घरत या पदापर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय प्रामाणिक पणे त्यांच्यासोबत असणाऱ्या कामगारांना व त्यांच्या सहकार्याना देतात हे त्यांचा मोठेपणा आहे. कामगार, सहकारी व परिवाराकडून झालेल्या जंगी स्वागताने महेंद्रशेठ घरत भारावून गेले व या पदामुळे माझी कामगार क्षेत्रातील जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.
