Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांना जादा डबे

रत्नागिरी : होळी सणामुळे वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी एक स्लीपरचा डबा वाढवण्यात आला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उधना ते मंगळुरू (09057) या विशेष गाडीला सुरत जवळील उधना येथून 24 मार्च 2024 रोजी सुटणाऱ्या फेरीसाठी तर मंगळुरू ते उधना (09058) या 25 मार्च 2024 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
याचबरोबर अहमदाबाद ते मडगाव (09412) या कोकण रेल्वे धावणाऱ्या दुसऱ्या विशेष गाडीला अहमदाबाद येथून सुटताना 25 मार्च रोजी च्या फेरीसाठी तर मडगाव ते अहमदाबाद (09411) या मार्गावर धावताना दिनांक 27 मार्च 2024 रोजी स्लीपरचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.

कोकणातील होळी उत्सवामुळे सध्या या मार्गावरील सर्वच गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. होळीसाठी या मार्गावर काही विशेष गाड्यांच्या फेऱ्या देखील चालू करण्यात आल्या आहेत. मात्र त्या आपुऱ्या पडत आहेत. गुजरातमधून मडगाव तसेच मंगळुरूपर्यंत धावणाऱ्या विशेष गाड्यांना ज्यादा डबा जोडण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE