जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून ५४ वे मरणोत्तर देहदान!

नाणीज, दि. ३१:- वरळी सेवा केंद्राचे अध्यक्ष कै. संतोष भगवान नार्वेकर, (वय ६०) रा. वरळी कोळीवाडा, मुंबई यांचे ३० मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांकडून त्यांचे मरणोत्तर देहदान  करण्यात आले.

मुलगा –  संकेत संतोष नार्वेकर व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांनचे पदाधिकारी यांनी त्यांचे पार्थिव नवी मुंबईतील एम जी एम हॉस्पिटलकडे सुपूर्द केले.  या निर्णयाबद्दल संकेत संतोष नार्वेकर आणि नार्वेकर परिवार यांचे संपूर्ण संप्रदायाचे वतीने खुप खुप अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास अमर शांती लाभो, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी हॉस्पिटलमध्ये मुलगा – संकेत संतोष नार्वेकर,  पत्नी – शर्मिला संतोष नार्वेकर, मुलगी – समृध्दी संतोष नार्वेकर आदी उपस्थित होते.

संस्थानच्या  स्व-स्वरूप संप्रदायाचे मुंबई जिल्हा निरीक्षक श्री मनोज पाडावे, जिल्हा व्यवस्थापक श्री शिवाजी करकरे, मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री  संतोष मोरे, तालुका प्रमुख श्री  सुधाकर बांदकर, जिल्हा वैद्यकीय विभाग प्रमुख श्री विकास भोसले, जिल्हा संजीवनी प्रमुख श्री विनय पडवळ, तालुका विशेष कार्यवाहक श्री चंद्रकांत कदम,

तालुका सचिव श्री सत्यवान घोगळे, तालुका आध्यात्मिक प्रमुख श्री एकनाथ आंब्रे, राजशिष्टाचार प्रमुख श्री ओमकार नाईक, तालुका प्रमुख मुंबई शहर  श्री देवगण नार्वेकर तसेच इतर तालुका समिती सदस्य उपस्थित होते. एम. जी. एम. हॉस्पिटल चे डॉकटर प्रकाश माने यांनी पार्थिव स्वीकारले.

जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी आपल्या भक्तांना मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. देहदान करून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शिकण्यास उपयोग होईल असे सांगितले. त्यानंतर देहदनाचे अर्ज भरण्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत ५४ जणांचे मरणोत्तर देहदान झाले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE