Konkan Railway | होळीसाठी जाहीर केलेल्या मेमू ट्रेनची आज शेवटची फेरी

  • चिपळूण -पनवेल आज दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार
  • पनवेल येथून रत्नागिरीसाठी मेमू निघणार रात्री ९ वाजता


रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी मार्गावर ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढती गर्दी लक्षात घेऊन वाढवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आधी जाहीर केलेल्या समोरच्या फेऱ्या काल 31 मार्च रोजी संपल्या. दोन दिवसापूर्वी जाहीर केलेलली चिपळूण पनवेल तसेच पनवेल रत्नागिरी मार्गावर आज ( सोमवारी ) शेवटची मेमू लोकल धावणार आहे.

होळी उत्सव आटोपून परतीला लागलेल्या प्रवाशांमुळे पनवेलसाठी रविवारी सुटलेल्या मेमू ट्रेनला अशी गर्दी झाली. गाडीत बसायला जागा न मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांना खाली बसूनच प्रवास करावा लागला. (छायाचित्र : चंदन विचारे )

याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ३ वाजून 25 मिनिटांनी चिपळूण येथून पनवेलसाठी पूर्णपणे विनाआरक्षित लोकल गाडी धावणार आहे. हीच गाडी नंतर स्वतंत्र गाडी म्हणून पनवेल येथून रात्री ९ वाजता रत्नागिरीसाठी सुटणार आहे. रेल्वेने या फेऱ्यांना मुदतवाढ दिली नाही तर मेमो लोकांची ही शेवटची फेरी असेल.

होळीसाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले आहेत. अशातच होळीसाठी रोहा ते चिपळूण मार्गावर आधी जाहीर करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या मध्य रेल्वेने नंतर रद्द केल्या. या रद्द केलेल्या गाडीच्या ठिकाणी चिपळूणकरिता पर्यायी गाडी जाहीर करण्यात आली नाही.

मात्र नंतर वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 4 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी फक्त रविवारी जाहीर करण्यात आलेल्या चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या. त्यानुसार काल दिनांक रविवारी तसेच आज सोमवारी देखील नेमू गाडीचे नियोजन करण्यात आले

आठ डब्यांची मेमू ट्रेन पूर्णपणे अनारक्षित गाडी


रेल्वेने आधी जाहीर केल्याप्रमाणे चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मेमू ट्रेन फक्त रविवारसाठी सोडण्यात येत होती. मात्र आता शनिवारी 30 मार्च तसेच सोमवारी दि. १ एप्रिल २०२४ रोजी देखील आठ डब्यांच्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या होणार नंतर जाहीर केले. ही मेमू लोकल गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 01160 ही मेमू ट्रेन चिपळूण येथून आज 1 एप्रिल 2024 रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
याचबरोबर पनवेल येथून रत्नागिरी साठी 01159 ही मेमू लोकल १ एप्रिल 2024 रोजी रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे रत्नागिरीला तीन चार वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE