रत्नागिरी, दि. १२ : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.
पहिल्याच दिवशी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी मारुती मंदिरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून आपला नामननिर्देशना अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे सादर केला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी दाखल करण्यात आलेला हा पहिलाच अर्ज आहे.
