उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायत येथे दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी अधिराज किशोर पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
अधिराज पाटील यांच्या घराण्यात सरपंच पदाचा वारसा चालत आलेला आहे.ते म्हणजे सन १९६० रोजी पहिले सरपंच अधिराज पाटील यांचे पणजोबा स्व. गणपत काथारी पाटील हे होते. त्यानंतरकाळात त्यांचे चुलत आजोबा श्री मनोहर गणपत पाटील हे होते, त्यानंतर त्यांची आजी सौ. गीता मुकुंद पाटील ह्या होत्या आणि आता अधिराज किशोर पाटील हे उपसरपंच पदी नियुक्त झाले आहेत.
पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार अधिराज पाटील यांच्या कडे सोपवून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
पागोटे ग्रामपंचायत कार्यालयात बहुसंख्येने उपस्थित असलेले मान्यवर, व ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्य यांनी यावेळी अधिराज पाटील यांच्या वर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी पागोटे ग्रामपंचायतचे नवनियुक्त उपसरपंच अधिराज पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच गावातील भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. १९८४ च्या शेतकरी लढ्यात बलिदान देणाऱ्या शहिदांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
