रत्नागिरी : गुजरातमधील सुरतजवळील उधना ते मंगळुरू दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी द्वि साप्ताहिक एक्सप्रेस उद्या दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी अतिरिक्त डब्यासह धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होऊ लागल्याने या मार्गे धावणाऱ्या गाडीचे कन्फर्म तिकीट मिळवणे अवघड झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वेने नियमित तसेच ज्यादा गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार उधना ते मंगळूरु (09057) ही आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष गाडी दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी स्लीपर श्रेणीच्या एका अतिरिक्त डब्यासह धावणार आहे. याचबरोबर दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी मंगळुरू ते उधना या फेरीसाठी (09058) या गाडीला स्लीपरचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.
उधना-मंगळुरू एक्सप्रेसचे थांबेवलसाड, वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, बिंदूर मुकांबिका रोड, कुंदापुरा, उडूपी, मुलकी तसेच सुरतकल.
