मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
