आंबव पोंक्षे येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उद्यापासून

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा २१ ते २३ एप्रिल या कालावधीत होत आहे.या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दि. २१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता चिपळूण येथून कलश आणण्यासाठी प्रस्थान, दुपारी ४ वाजता आरवली ते मारुती मंदिर आंबव पोंक्षेपर्यंत सवाद्य कलशांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री मंदिरात ग्रामस्थांची भजने होणार आहेत.

२२ रोजी सकाळी ८ वा गणपती पूजन व पुण्याहवाचन, प्रोक्षण विधी, नांदी श्राद्ध,आचार्यवरण, ९ वाजता वास्तुशांत, मुख्यदेवता स्थापना,नवग्रहस्थापना, ११ वा कलश पूजन, होमहवन, कलशारोहण होणार आहे. १२ वा बलिदान पूर्णाहुती,,१२.३० मंदिर प्रदक्षिणा,आशीर्वाद ग्रहण,तर १.३० वा महाप्रसाद होणार आहे.रात्री १० वाजता श्री वाघजाई देवी नमन मंडळ आंबव पोंक्षे यांचे नमन होणार आहे.

दि. २३ रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे. यामध्ये सकाळी ६ ते ७ या कालावधीत हनुमान जन्मोत्सव,७ ते ८ या कालावधीत नवस लावणे,नवस पूर्ती सोहळा होणार आहे.८.३०/वाजता मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालणे, ११ वाजता सत्यनारायण महापूजा व आरती होईल.तर १ वाजता महाप्रसाद, ४ वाजता हळदीकुंकू,सायंकाळी ७ वाजता शिवगंध तरुण मंडळ सुतारवाडी आंबवं पोंक्षे यांचे भजन होईल. ९ वाजता मंदिर जीर्णोद्धारा वेळी दिलेल्या देणगीदारांचा सत्कार समारंभ होणार आहे तर रात्री १०.३० वाजता रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे पालवकरवाडी येथील श्री संतोषी माता नमन नाट्य मंडळाचे बहुरंगी नमन होणार आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे, असे आवाहन जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दीपक शिगवण, सचिव राजेंद्र जाधव, गावकर मोहन भुवड व मानकरी मंडळी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE