Konkan Railway | करंजाडी ते चिपळूण दरम्यान २३ एप्रिलला ‘मेगाब्लॉक’

दिवा -सावंतवाडी सह ३ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान मंगळवार दि 23 एप्रिल 2024 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा 3 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामध्ये सावंतवाडी रोड ते दिवादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्यातील करंजाडी रत्नागिरीतील चिपळूण दरम्यान दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटे असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या तीन एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी कोईमतूर -जबलपूर विशेष (02197) ही दि. 22 एप्रिल रोजी प्रवास सुरु होणारी गाडी रत्नागिरी ते कामथे दरम्यान 1 तास 10 मिनिटे रोखून ठेवली जाणार असून दि. 23 रोजीची सावंतवाडी रोड ते दिवा दरम्यान रोज धावणारी एक्स्प्रेस गाडी (10106) सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 40 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.


या दोन गाड्यांशिवाय लो. टिळक टर्मिनस ते तिरुअनंतरपुरम दरम्यान धावणारी (16 345) नेत्रावती एक्स्प्रेस कोलाड ते वीर स्थानकांदरम्यान 50 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE