संगमेश्वर दि. २२(प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे जय हनुमान मित्र मंडळ सोनवडे वरची वाडी यांच्यावतीने मंगळवार २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या सर्व कार्यक्रमांना भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

माध्यमिक विद्यामंदिर सोनावडे च्या प्रांगणात असलेल्या हनुमान मंदिरात जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त सकाळी ६ : १५ वा. श्रींचा जन्मोत्सव, हनुमान स्तोत्र, श्रींचा पाळणा, हनुमान चालीसा पठण, सायं. ३ ते ५ वा. हळदी कुंकू , सायं. ७ वा. महाआरती, रात्रौ ८ वा. नांदेडकर बंधू काटवली यांचे संगीत भजन, रात्रौ. १० वा. श्री वीरेश्वर नमन मंडळ केळे रत्नागिरी यांचे झांजगी नमन. या सर्व कार्यक्रमांना भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष जय हनुमान मित्र मंडळ सोनवणे वरचीवाडी यांनी केले आहे.
