लांजा : मुबंई गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस पेट्रोल पंपानजीक धावत्या आयशर टेम्पोला अचानक लागलेल्या आगीपसून लांजातील युवक नंदकुमार सुर्वे यांच्या प्रसंगावधानाने आणखी नुकसान होण्यापासून वाचविण्यत यश आले. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता घडली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या नंदकुमार यांनी स्वखर्चाने तीन हजार लिटर पाण्याचा टॅंक आणून आग लागलेल्या टेम्पोला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
लांजाहून राजापूरकडे आयशर टेम्पो MH08 AP 7124 लोखंडी साहित्य घेऊन चालक बोरकर निघाले होते. लांजा महामार्गावर रेस्ट हाऊसनजीक टेम्मो आला असता अचानक चालत्या गाडीतून पुढील बोनेटमधून आग आणि धूर येत असल्याचे निदर्शनास आले चालक बोरकर यांनी तत्काळ टेम्पो पेट्रोल पंम्पापुढे घेऊन सुरक्षित ठिकाणी आले टेम्पो बंद खाली उडी घेतली तोपर्यंत अधिक आग वाढत गेली होती. आगीच्या ज्वाला वाढू लागल्या नगरसेवक संजय यादव यांनी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार लक्ष्मण सुर्वे यांना ही घटना सांगितली. नंदू यांनी तातडीने आपला पाणी टँकर पाणी भरून घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयन केले.
यावेळी संतोष पाटोळे, किरण सावंत, रिझवान मुजावर, पोलीस श्री मुजावर, रिक्षाचालक लांजेकर, नगरसेवक संजय यादव यांनी आगीपसून होणाऱ्या नुकसानीला आळा घातला.
