सौ. नीलमताई राणे यांचा देवरूख ग्रामीण भागातील महिलांशी संवाद

  • महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणेंना मतदान करण्याचे केले आवाहन

देवरूख (सुरेश सप्रे) :  रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण (दादा) राणे यांच्या प्रचारार्थ सौ. नीलमताई राणे यांचा जिल्हा दौरा सुरु असुन आज देवरूख ग्रामीण भागाचा दौरा करून अनेक महिलांशी संवाद साधला. तसेच जिल्हा सरचिटणीस सौ. संगिता जाधव यांनी आयोजित केलेल्या महीला मेळावा उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यावेळी सौ. नीलमताईंनी राणेंना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

सौ. राणे यांनी देवरूख शहरातील महिलांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला तसेच काहीं महीला पदाधिकारी यांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेवून प्रचारात सक्रिय सहभाग घेवून गावातील महिलाभगिनींचे जास्तीत जास्त मतदान होईल याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

यावेळी केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणेंना निवडून आणण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करावे, असे आवाहन केले. महिलांनी सुध्दा उत्स्फूर्त  प्रतिसाद देऊन राणे साहेबांना निवडून आणण्याचा निर्धार केला.

यावेळी राष्ट्रवादीच्या सौ. पूजा निकम. तालुकाध्यक्ष मालती करंबेळे. उत्तर रत्नागिरी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी , संगमेश्वर महिला तालुकाध्यक्षा स्नेहा फाटक. माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये. जिल्हा पदाधिकारी मुकुंद जोशी,सुशांत मुळे. अमोल गायकर. उपस्थित होते.
यावेळी सरचिटणीस सौ. संगीता जाधव यांनी सौ. राणे व सौ. निकम यांचा सत्कार करण्यात आला

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE