पोमेंडीतील सोमेश्वर तरुण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

गुहागर : तालुक्यातील श्री सोमेश्वर तरुण मंडळ, पोमेंडी (पूर्व रांगळे वाडी) मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार दि. २९ एप्रिल ते बुधवार दि. १ मे २०२४ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त २९ रोजी सकाळी ८ वाजता वृक्षरोपण, १० ते दुपारी १ उपांत्य व अंतिम फेरीतील क्रिकेट सामने, १ ते २ महाप्रसाद, २.३० ते ३०.३० वा. वेध भविष्याचे, सायं. ५ ते ७ वाजता मुलांचे स्पर्धात्मक कार्यक्रम, रात्री ७ ते ८ महाप्रसाद आणि ८ ते ११ वाजता कलाविष्कार (प्रौढ) कार्यक्रम सादर करणार आहेत.


दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वा. मुले, महिला व पुरुष यांचे विविध स्पर्धात्मक कार्यक्रम, १ ते २ महाप्रसाद, २.३० ते सायं. ७ खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या धर्तीवर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. रात्री ७ ते ८ महाप्रसाद, ८ ते ११ दुनिया बाल कलाकारांची हा कार्यक्रम लहान मुले सादर करणार आहेत.
दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता परिसरातून प्रभात फेरी, ९ वा. बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचा उद्घाटन सोहळा, १० वाजता उपस्थित मान्यवर आणि वाडीतील जेष्ठ मंडळी यांचा सत्कार, ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, ३ वाजता श्री महालक्ष्मी महिला मंडळ यांचा हळदीकुंकू समारंभ, सायं. ५ वा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या वाडीतील व्यक्तींचा सत्कार, ७ वाजता श्री महालक्ष्मी महिला मंडळ यांचे भजन, रात्री ८ वाजता महाप्रसाद तर १० वाजता श्री सोमेश्वर तरुण नमन मंडळ पूर्व रांगळेवाडी पोमेंडी यांचे बहुरंगी नमन सादर केले जाणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


श्री सोमेश्वर तरुण मंडळ गेली ५० वर्षे अव्याहतपणे आणि एकजुटीने समजोभिमुख काम करत आहे. बदलत्या काळानुसार गावात सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, शैक्षणिक, सामाजिक व सर्व क्षेत्रात इथल्या प्रत्येकाची प्रगती व्हावी, हे धेय्य मंडळाचे आहे. याप्रमाणे मंडळ कार्यरत आहे. वाडीतील बहुतांशी ग्रामस्थ कामानिमित्त मुंबई व अन्य ठिकाणी वास्तव्यास असले तरी प्रत्येक सणामध्ये आवर्जून आपल्या गावात येऊन गुणागोविंदाने सगळे सण साजरे करत असतात.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE