मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 10 जून 2024 पासून आठवड्यातील सहा ऐवजी तीनच दिवस धावणार आहे. या प्रीमियम ट्रेन बरोबरच मुंबई मडगाव तेजस तसेच एलटीटी मडगाव या गाडीच्या फेऱ्या देखील कोकण रेल्वे मार्गावर अमलात येणाऱ्या पावसाळी वेळापत्रकामध्ये घटणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी (22119/22120) ही गाडी 11 जून 2024 पासून आठवड्यातून पाच ऐवजी तीन दिवस धावणार आहे. याचबरोबर सध्या सहा दिवस धावणारी मुंबई सीएसएमटी ते मडगाव (22229/22230) ही वंदे भारत एक्सप्रेस 10 जून 2024 पासून आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
या गाडीशिवाय सध्या आठवड्यातून चार दिवस धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (11099/11100) ही गाडी दिनांक 14 जून 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रका प्रमाणे आठवड्यातून दोनच दिवस जाणार आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
