वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांना निवडणूक खर्च सनियंत्रण समितीची नोटीस


रत्नागिरी, दि.२७ : निवडणूक खर्च तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटीबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी मारुती रामचंद्र जोशी यांना निवडणूक खर्च सनियंत्रण समितीने नोटीस बजावली आहे.
निवडणूक प्रक्रियादरम्यान निवडणूक विषयक खर्चाची प्रथम तपासणी खर्च निरीक्षक (निवडणूक खर्च) यांच्या पथकामार्फत 26 एप्रिल रोजी केली असता अभिलेख्यांमध्ये पुढीलप्रमाणे त्रुटी आढळून आलेल्या आहेत. 19 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये राहूल पवार यांना 8 लाख 47 हजार वर्ग केल्याचे दिसून येते. या व्यवहाराबद्दल संदिग्धता निर्माण होत असल्याने, त्यावर स्पष्टीकरण मागण्यात आले. त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
श्री. पवार यांचा व्यवसाय कोणता आहे. कोणत्या विषयामध्ये प्राविण्य प्राप्त आहे. ते निवडणूक प्रचारामध्ये कोणती भुमिका बजावणार आहेत. तसेच वर्ग करण्यात आलेल्या रकमेबाबत आणि श्री. पवार यांचे बँक स्टेटमेंट सादर करण्याबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत कळविले आहे.
48 तासात सुधारित अभिलेखे न आल्यास लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील 77/1 नुसार आणि भादवि 171-1 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE