रत्नागिरी : येथील पोलीस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर वृद्धाचा डोक्यात दगड किंवा तत्सम जड वस्तू घालून खून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
रत्नागिरी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर एका जुन्या कंपाउंडमध्ये येथील एका इमारतीत देखरेखीच्या कामाला असलेल्या वाडेकर नामक वृद्धाचा डोक्यात दगड अगर जड वस्तू घालून खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांची तपास यंत्रणा तत्काळ कामाला लागली आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
- Konkan Railway | मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १० जूनपासून सहा ऐवजी तीनच दिवस धावणार!
