वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण कोटा असूनही उपयोग मात्र शून्य!

  • ऑनलाइन तसेच पीआरएस खिडकीवरही दिव्यांगांचे आरक्षण होत नसल्याचे उघड

मुंबई : देशभरातील विविध मार्गांवर धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांकरिता चार जागांचा आरक्षण कोटा आहे. मात्र, या कोट्यामधून तिकीट बूक करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांसाठी हा कोटा असूनही नसल्यासारखाच आहे.

याबाबत सखोल माहिती घेतली असता रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत त्या त्या श्रेणीतील कोटा अगर त्या कोट्यामधून कन्सेशन मिळवण्यासाठी रेल्वेकडून आरक्षण प्रणालीत त्यासाठी विशिष्ट कोडचा अंतर्भाव करावा लागतो.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चार जागांचा दिव्यांगाना आरक्षण कोटा

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांना पूर्वी दोन जागांचा आरक्षण कोटा मंजूर होता. जुलै 2023 मध्ये वाढवून तो दुप्पट म्हणजे चार जागांचा करण्यात आला. या कोट्यातून दिव्यांग त्यांचे सवलतीचे तिकीट आरक्षित करून या गाडीतून प्रवास करू शकतात. वंदे भारत एक्सप्रेसच्या आरक्षण प्रणालीत सध्या असा कोटा दाखवतो देखील आहे. मात्र या कोट्यामधून ऑनलाइन तसेच रेल्वेच्या पी आर एस वर देखील बुकिंग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत काही दिव्यांग व्यक्तींनी रेल्वेच्या ही बाब निदर्शनास देखील आणून दिली आहे. मात्र आजतागायत त्याकडे दुर्लक्ष केल्याने वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या आरक्षण कोट्यातून तिकीट बुक करता येत नाही. त्यामुळे अशा प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करावयाचा असल्यास नियमित प्रवाशांप्रमाणे नॉर्मल आरक्षण करावे लागत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE