पी. वेलरासू कोकण विभागाचे नवे महसूल आयुक्त

नवी मुंबई, दि.30:- कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सूलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. वेलरासू यांनी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवी मुंबई मधील एस आर ए विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची कोकण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.
श्री. वेलरासू हे 2002 च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. पी. वेलरासू यांना जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. पी. वेलरासू यांचे मास्टार्स इन पब्लिक अफेअर पब्लिक पॉलीसी ॲनालीसीचे शिक्षण कॅलीफॉरनीया विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स केले आहे.
यावेळी आयुक्त पी. वेलरासू यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. आणि कोकण भवन मधील महत्त्वाच्या विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE