- कोकण रेल्वे मार्गावर १४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४ रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने धावणार आहे. दि. 14 मे रोजी कोकण रेल्वे मार्गावर उडूपी ते सुरतकल दरम्यान घेण्यात येणाऱ्या या मेगा ब्लॉकमुळे या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून १५ मिनिटांपर्यंत असा सुमारे अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकमुळे दिनांक 13 मे 2024 रोजी मुंबईतून मंगळूरू जंक्शनसाठी सुटलेली दैनंदिन सुपरफास्ट गाडी (12133) मडगाव आणि उडुपी दरम्यान एक तास 30 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
