सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून


रत्नागिरी, दि.16 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली असून, प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून आहे.

सर्व युध्द विधवा / इतर माजी सैनिक विधवा / माजी सैनिक व त्यांची अनाथ पाल्ये यांनी याचा फायदा घ्यावा. शिल्लक राहिलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
विद्यार्थी क्षमता चिपळूण सैनिकी मुलांचे वसतिगृह- ४० , सैनिकी मुलीचे वसतिगृह- क्षमता ४० आहे.


प्रवेश फी चे दर प्रतिमहा खालील प्रमाणे आहेत
सेवारत सैनिक- भोजन, निवास व सेवाकरासह- अधिकारी -रु. ३,५००/-, जे.सी.ओ. रु.३,०००/- शिपाई/ एनसीओ ज- रु.२,८००/- असे आहेत.


माजी सैनिक- भोजन, निवास व सेवाकरासह- (सवलतीचे दर) अधिकारी व ऑननरी रैंक -रु.३,०००/- ,जे.सी.ओ.- रु.२,८००/-,शिपाई / एनसीओज-रु.२,५००/- असे आहेत.
युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्य यांना निःशुल्क आहे. सिव्हिलियन- भोजन, निवास व सेवाकरासह (पूर्णदर)- रु. ३,५००/- प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम रु. १,०००/- आकारण्यात येईल.
वसतिगृह प्रवेशासाठी खालीलप्रमाणे प्राधान्य क्रम देण्यात येईल.
युध्द विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये, पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये, बी. एड. डी. एड, पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे),१२ वी, ११ वी व १० वी या क्रमाने (गुणवत्ता यादीप्रमाणे) माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असलेस सिव्हिलियन पाल्य (संचालकांच्या परवानगीने)
अधिक माहितीसाठी- सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण-७३८७५५१३४५, सैनिकी मुलींचे वसतिगृह, चिपळूण- ८३९०६७५९०२ यावर संपर्क साधावा.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE