अंमली पदार्थ विरोधी शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह


रत्नागिरी, दि. 27 : लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.


नार्को को ऑर्डीनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदी उपस्थित होते.


24 एप्रिलच्या रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एनडीपीएस अंतर्गत दाखल गुन्हे तसेच इतर प्रकरणातील प्रलंबित असणारे हद्दपारीचे गुन्हे त्यांनी मार्गी लावावेत. आप-आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठी विविध यंत्रणांचे सहकार्य घ्यावे.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत जनजागृती करणाऱ्या छोट्या फिल्मस् बनविण्यात आल्या आहेत. त्याचा प्रसारही सर्वत्र करावा. या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार सहभागी झाले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE