जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

नाणीज, दि. २७ :  जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाणीजच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेचा यंदाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सलग सहा वर्षे या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागतो आहे.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्व जाती-धर्माच्या गोरगरीब मुलांसाठी मोफत शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे. गेली १४ वर्षे अखंडीतपणे मोफत व दर्जेदार ज्ञानदानाचे हे कार्य सुरू आहे.


या प्रशालेचे वैशिष्ट्य म्हणजे एच. एस. सी. च्या सायन्स व कॉमर्स शाखेच्या आत्तापर्यंतच्या चारही बॅचचा निकालदेखील 100 टक्के लागला आहे. तसेच एसएससी बोर्ड परीक्षेचा सलग सहाव्या बॅचचा निकालदेखील शंभर टक्के लागलेला आहे. सर्व विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीमध्ये अर्थात डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.


प्रशालेच्या एसएससी बोर्ड परीक्षेतील पहिले तीन विद्यार्थी याप्रमाणे- प्रतिक राजेश खंदारे या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. नियती विनोद ठाकरानी हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सत्यम अनिल कांबळे याने ९०.२० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीस आशीर्वाद दिले आहेत.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने व संस्थानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर इन्स्टिट्यूटचे चेअरमन अर्जुन फुले व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अबोली पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE