लांजा : तालुक्यातील शिरंबवली गावची सुकन्या, दुर्गम भागातील कु. हर्षाली दिगंबर सावंत हिने कोणताही खासगी क्लास न लावता 95 टक्के गुण प्राप्त करून दहावी शाळांत परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तिचे हे यश कौतुकास्पद ठरले आहे.
आंजणारी ग्रुप ग्रामपंचायतीमधील शिरंबवली गाव अतिदुर्गम गाव. या गावातील हर्षाली दिगंबर सावंत ही पहिलीपासून स्वयं अध्ययन करून अभ्यासात हुशार होती. शिरंबवली गावात एसटीची सोय नाही. आठ किलोमीटर पायपीट करुन आंजणारी गावात येऊन लांजाला माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना यावे लागते. हर्षालीचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर आई-वडिलांनी तिला विलवडे येथे हर्षालीची मावशी दिपाली भगत आणि काका मनोज भगत यांच्या घरी राहुल माध्यमिक शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला. हर्षालीने ओणी येथील श्री शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल येथे आठवीपासून प्रवेश घेतला ती दररोज विलवडे येथून इजा करीत असे अभ्यासामध्ये सातत्य आणि चिकाटी होती हर्षाली ने दहावी इयत्तेत कोणताही खासगी क्लास लावला नाही. शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या टिप्स ती अमलात आणत होती. दहावीचा परीक्षेच्या काळात ती ठराविक तास अभ्यास करत होती. इतर वेळी अवांतर वाचन चित्रकला हा तिचा छंद होती. तिच्या यशात आई वडील यांच्याबरोबर मावशी दिपाली आणि काका मनोज भगत यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन असल्याचे तिने सांगितले.
हायस्कूलच्या मुख्याध्यापक सौ. भक्ति सावंत यांच्यासह टीचर संपूर्ण कांबळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळायचे, असे तिने सांगितल. हर्षालीची आई शिरंबवली गावची पोलीस पाटील असून हर्षाली ने शिरंबवली गावाचे नाव रोशन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
