देवरुख दि. ३० : घरावर तुळशीपत्र ठेवणे या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे विलास होडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार सूर्यकांत सुर्वे, शृंगारपूर व रामचंद्र कुवळेकर, निवे बु।। यांना देण्यात येणार आहे. विलास होडे यांच्यासारखे काम करणाया व त्यांना अभिप्रेत असलेले काम सातत्याने करणाया व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.


अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळाला सातत्याने सहकार्य व विलास होडे यांचेबरोबर सातत्याने संघर्षात उतरणाऱ्या सूर्यकांत सुर्वे, शृंगारपूर व बहुजन विकास आघाडीची स्थापना, सहकारी क्षेत्रातील काम व बेदखल कुळांच्या प्रश्नांची लढाई लढणाया रामचंद्र कुवळेकर, निवे बु।। यांची विलास होडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
सोमवार १ जुलै २०२४ रोजी विलास होडे यांच्या १६ व्या स्मृतिदिन दिवशी कारभाटले हायस्कूल, कारभाटले येथे होणाया पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार निवड समिती प्रमुख युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.
