तुरंबव : 30 जून : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील भुमिकन्यानी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावामधील महिलांसाठी रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे तसेच प्राध्यापिका कश्मिरा दुड्ये, प्राध्यापिका अमृता नेर्लेकर, प्राध्यापिका सिद्धी फरांदे, सौ. सलोनी पंडित (ग्रामपंचायत सदस्य ), नेहा आयरे (ग्रामसंघ कोषाध्यक्ष),अलका सावंत (ग्रामसंघ सचिव) उपस्थित होत्या.
रानभाज्या या निसर्गतः उपलब्ध होतात व त्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात याचे महत्त्व डॉ.शमिका चोरगे यांनी महिलांना सांगितले. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच महिलांनी प्रत्येक रानभाजीचे गुणधर्म परिक्षणावेळी समजावून सांगितले.
या मृदागंध कृषी संघात कृषी विद्यालयाच्या विद्यार्थिनी अवंतिका राजेशिर्के, सोनाली राठोड, गौरी पवार, साक्षी जाधव , श्रेया राणे, साक्षी पिंपळकर, हेमांगी गदमले, गायत्री तिखंडे, श्रेया मोरे, रिशिता सोपारकर, सानिका माने , प्रतीक्षा सावर्डेकर यांचा समावेश आहे.
