लांजात बेनीखुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

लांजा : तालुक्यातील बेनीखुर्द येथे माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या गुरांवर बिबट्याने हल्ला केल्याने एक गाय जखमी झाली. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजन्याच्या दरम्यान बिबट्याने गुरांच्या कळपायावर केलेल्या हल्ल्यामुळे बेनीखुर्द गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


बेनिखुर्द येथील मनोहर श्रीपत साळुंके या शेतकऱ्याची गाय जखमी झाली आहे. भात लावणीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेतामध्ये मग्न झाले आहेत. मात्र बिबट्याच्या दिवसाढवळ्या वावरण्याने शेतकरी मध्ये भीतीचे सावट पसरले आहे. शुक्रवारी सकाळी सोळुंके आपली गुरे घेऊन लोकवस्तीपासून जवळच असलेल्या माळणावर गेले होते. सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान गुरांचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बिबट्या गुरांवर हल्ला करताना पाहून ते ओरडल्याने बिबट्या शेजारील जंगलात पळाला. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये साळुंके यांची एक गाय जखमी झाली.

आठ दिवसांपूर्वी बिबट्याने बेनिखुर्द गावातील श्वानांवर हल्ला केल्याच्या घटना घडली होती. मात्र पुन्हा बिबट्याने आपला मोर्चा वळवला आहे. डी बिबट्याच्या दिवसा वावरण्याने बेनिखुर्द गावात भीती पसरली आहे. बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE