मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दि. १३ जुलै २०२४ रोजी आपल्या मुंबई दौऱ्यात मुंबईतील ९५६ कोटी रुपयांच्या बहुविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी तसेच राष्ट्राला समर्पण केले. पंतप्रधानांनी कल्याण यार्ड रीमॉडेलिंग आणि तुर्भे येथील गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी केली.
पंतप्रधान यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म्स आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ राष्ट्राला समर्पित केले.
याचबरोबर त्यांनी मुंबईत कल्याण यार्ड रीमॉडेलिंग आणि तुर्भे गति शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी केली तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म्स आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म क्र.१० आणि ११ राष्ट्राला समर्पित केले.


यावेळी पंतप्रधानांसोबत श्री रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र; श्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र; श्री पीयूष गोयल, माननीय केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री; श्री रामदास आठवले, माननीय केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री; श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र; श्री अजित पवार, माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र आणि इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
प्रकल्पनिहाय तपशील
- कल्याण यार्ड रीमॉडेलिंगची पायाभरणी*
- प्रकल्पाची किंमत – रु. ८१३ कोटी*
- कल्याण रेल्वे स्थानक हे मुंबई विभागातील प्रमुख आणि व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
- प्रकल्पाचे फायदे:
- कल्याण यार्ड रीमॉडेलिंगमुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतूकीचे पृथक्करण करण्यात मदत होईल.
- गुड्स यार्डच्या एकीकरणामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होईल.
- दररोज लाखो प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी प्राप्त होईल.
- रीमॉडेलिंगमुळे अधिक गाड्या हाताळण्यासाठी यार्डची क्षमता वाढेल, गर्दी कमी होईल आणि ट्रेनचा वक्तशीरपणा सुधारेल.
- तुर्भे येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी
- प्रकल्पाची किंमत – रु.२६.८० कोटी
- हा प्रकल्प ३२,६२८ चौरस मीटर क्षेत्रफळात व्यापलेला आहे. या प्रकल्पाद्वारे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल ज्यामध्ये बॅलास्ट साइडिंग लाइनचा १८० मीटर विस्तार करणे, अर्ध्या रेक लांबीच्या नवीन हँडलिंग लाइनची तरतूद, काँक्रीट रेल लेव्हल आयलँड प्लॅटफॉर्म, काँक्रीट ऍप्रोच रोड आणि सुमारे ९,७८८ चौ.मी. पक्क्या स्टॅकिंग क्षेत्राची तरतूद समाविष्ट आहे.
- प्रकल्पाचे फायदे:
- स्थानिक लोकांना अतिरिक्त रोजगाराच्या संधी मिळतील.
- अधिक मालवाहतूकीतून महसुलात वाढ होईल.
- मुंबईच्या उत्कर्षासाठी सिमेंट आणि इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी एक अतिरिक्त टर्मिनल.
- लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म्सचे राष्ट्राला समर्पण*
- प्रकल्पाची किंमत – रु. ६४ कोटी
- हा प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. यामध्ये कव्हर शेड आणि वॉशेबल ऍप्रनसह ६०० मीटरच्या नवीन पूर्ण लांबीच्या प्लॅटफॉर्मचा तसेच ६ मीटर रुंदीचा फूट ओव्हर ब्रिजच्या विस्ताराचा समावेश आहे.
- फायदे:
- अधिक लांबीचे प्लॅटफॉर्म जास्त लांबीच्या गाड्या सामावून घेऊ शकतात, ज्यामुळे प्रति ट्रेन अधिक प्रवासी येऊ-जाऊ शकतात आणि वाढलेली ट्रॅफिक हाताळण्यासाठी स्टेशनची क्षमता सुधारते.
- विस्तारित प्लॅटफॉर्म प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अधिक जागा प्रदान करेल, गर्दी कमी करेल आणि प्रवाशांचा ओघ सुधारेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११चे राष्ट्राला समर्पण
- प्रकल्पाची किंमत – रु. ५२ कोटी
- हा प्रकल्प जून २०२४ मध्ये पूर्ण झाला. कव्हर शेड आणि वॉशेबल ऍप्रनसह प्लॅटफॉर्म ३८२ मीटरने वाढविण्यात आले.
- प्रकल्पाचे फायदे:
- २४ डब्यांपर्यंत गाड्यांचे परीचालन केले जाईल त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढेल.
- विस्तारित प्लॅटफॉर्म प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अधिक जागा प्रदान करतील, गर्दी कमी होऊन प्रवाशांना लाभ होईल.
